श्री एकवीरा देवीची यात्रा उत्साहात सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्री एकवीरा देवीची 
यात्रा उत्साहात सुरू
श्री एकवीरा देवीची यात्रा उत्साहात सुरू

श्री एकवीरा देवीची यात्रा उत्साहात सुरू

sakal_logo
By

लोणावळा, ता. २७ ः राज्यातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व वेहेरगाव येथील एकवीरा गडावर वसलेल्या श्री एकवीरा देवीच्या यात्रेस उत्साहात सुरवात झाली. देवघर, वाकसई येथील ग्रामस्थांनी एकवीरा देवीचा भाऊ मानलेल्या काळभैरव देवाची सायंकाळी उत्साहपूर्ण वातावरणात पालखी सोहळ्यास वाजत-गाजत सुरवात केली. चैत्र शुद्ध षष्ठी ते अष्टमी अशी तीन दिवस यात्रा पार पडत आहे.
वेहेरगाव, कार्ला येथील डोंगरावर वसलेली एकवीरा देवी ही अत्यंत जागृत व नवसाला पावणारी देवी अशी आख्यायिका असणाऱ्या देवीची यात्रा हे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जाते. विशेषतः कोकणातील असंख्य कोळी तसेच आगरी बांधवांची एकवीरा देवीवर मोठी श्रद्धा आहे. देवीच्या दर्शनासाठी कोकणातून मोठ्या संख्येने पालख्यांची रांग लागली होती. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन पोलिसांच्या वतीने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात्रा काळात कार्ला परिसरात दारूबंदी असल्याने पोलिसांच्या वतीने भाविकांच्या गाड्यांची तपासणी करत गाड्या सोडण्यात येत होत्या. आज यात्रेचा मुख्य दिवस व देवीचा पालखी सोहळा आहे. त्यामुळे एकवीरा गडावर देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.