मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या 
मावळ तालुकाध्यक्षपदी कांबळे

मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या मावळ तालुकाध्यक्षपदी कांबळे

Published on

लोणावळा, ता. २ : मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या मावळ तालुकाध्यक्षपदी निरंजन कांबळे यांची तर लोणावळा शहराध्यक्षपदी योगेश पैलकर यांची निवड झाली. संघटनेची लोणावळा व मावळ यांची वार्षिक बैठक येथे पार पडली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव चौधरी तसेच सचिव सचिन गाडे उपस्थित होते. यावेळी नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : निरंजन कांबळे (अध्यक्ष, मावळ तालुका), जब्बार शेख (कार्याध्यक्ष, मावळ) जे. के. गरड (सचिव), सोमदत्त शिंदे (उपाध्यक्ष, मावळ), लोणावळा शहर कार्यकारिणी : योगेश पैलकर (अध्यक्ष, लोणावळा शहर), हर्षल राणे (कार्याध्यक्ष), करण गरुड (सचिव), उदय बोभाटे (उपाध्यक्ष)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.