देवळेजवळ बसला अपघात; १९ जखमी, तीन जण गंभीर

देवळेजवळ बसला अपघात; १९ जखमी, तीन जण गंभीर
Published on: 

लोणावळा, ता.१७ : पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर देवळे नजीक खासगी बसला झालेल्या अपघातात १९ प्रवासी जखमी झाले आहे. त्यापैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. गुरुवार (ता.१७) पहाटे सव्वापाच वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूरहून बोरिवली, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अशोका ट्रॅव्हल्सच्या खासगी प्रवासी बसने (एमएच ५१ सी ०९०९) द्रुतगती मार्गावर किलोमीटर क्र.६१ नजीक देवळेजवळ पुढे जाणाऱ्या आयशर टेम्पोला धडक दिली. या अपघातामध्ये चालक आणि हेल्परसह १९ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यातील तीन प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे.

अशी आहेत जखमींची नावे...
आशिया तांबोळी, फुलाबाई श्रीकांत काळे, चालक दिनकर डोंगरे, हेल्पर विशाल माने, संजय श्रीकांत काळे, संजय शिवाजी भोसले, मंगल सुतार, अमोल पाटील, प्रिया नाडर, संतोष कुंभार, वैष्णवी कुंभार, वैभव जाधव, शुभम चिमगावकर, स्वप्नील सोर्दी, दर्शना गावडे, सुनीता पोळ अशी जखमींची नावे असून अन्य तिघांची नावे समजली नाही.

बसच्या केबिनचा चक्काचूर
पहाटेच्या सुमारास बसमधील प्रवासी साखर झोपेमध्ये असताना हा भीषण अपघात झाला.
बसने टेम्पोला दिलेली धडक एवढी जोरदार होती की, त्यामध्ये बसच्या केबिनचा चक्काचूर झाला.
अपघाताची माहिती मिळताच खंडाळा, लोणावळा ग्रामीण पोलिस, आयआरबी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात जखमी प्रवाशांना दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर मुंबईकडील मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त वाहन बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.