सामाजिक-आर्थिक प्रगतीसाठी एकजूट राखा

सामाजिक-आर्थिक प्रगतीसाठी एकजूट राखा

Published on

लोणावळा, ता. २३ : गुरव समाजाच्या समस्या, विकास, आणि सामाजिक-आर्थिक प्रगतीसाठी समाजाने एकजूट राखली पाहिजे, असे मत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. अण्णासाहेब शिंदे यांनी व्यक्त केले.
अखिल गुरव समाज संघटनेचा समाज मेळावा वाकसई येथे झाला. या वेळी शिंदे बोलत होते. राष्ट्रीय महासचिव विलास पाटील, संजय आवटे, सचिन गुरव, योगेश गुरव, दिलीप घनवट, रूपाली वाघमारे, पुरुषोत्तम वाघमारे, बाळासाहेब भदे, समीर गुरव, माधवी साळुंखे, मल्हारी भदे, उमेश गुरव, सखाराम घनवट, सचिन महाराज गुरव, नामदेव देशमुख आदी उपस्थित होते. मावळ, पुणे, सातारा, रायगड, मुंबई, कोल्हापूरसह राज्यभरातून मोठ्या प्रमाणात गुरव समाज बांधव उपस्थिती लावली. संघटनेची बांधणी, श्री संत काशिबा महाराज पतसंस्था, मंदिर व ट्रस्टविषयी शिंदे यांनी मार्गदर्शन केले. शीतल शिंदे, संतोष वाघमारे, श्रद्धा साखरे, भाग्यश्री भालेराव, विजय ठोसर, धनंजय दरे, शंकर शिर्के यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात मावळ तालुका, पुणे जिल्हा तसेच राज्यभरातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. नितीन देशमुख यांनी प्रास्ताविक केले. नामदेव देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. पांडुरंग भदे यांनी आभार मानले.
अखिल गुरव समाज संघटनेची मावळ तालुका कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : तालुका अध्यक्ष : नवनाथ देशमुख, कार्याध्यक्ष-महेंद्र शिर्के,
सचिव-पांडुरंग भदे, सहसचिव-नितीन देशमुख, खजिनदार- कैलास गायकवाड, सहखजिनदार- विशाल घनवट, उपाध्यक्ष- विष्णू घनवट, रमेश गायकवाड, किसन शिंदे, गंगाराम गायकवाड, अर्जुन कदम, अनंता गायकवाड, सल्लागार- शंकर ठोसर, हरिभाऊ कदम, बाळू गुरव, किसन गायकवाड, लक्ष्मण गुरव, भास्कर शिंदे. महिला अध्यक्षा- रंजना घनवट (गुरव), उपाध्यक्षा- सारिका कदम, स्वाती खालखोने,
लोणावळा शहराध्यक्षा- कांचन गायकवाड, कामशेत शहराध्यक्षा- नीता देशमुख. युवा अध्यक्ष- गणेश गुरव, उपाध्यक्ष- संतोष घनवट,
संघटक- सदाशिव देशमुख. प्रसिद्धी प्रमुख- शंकर देशमुख, नाणे मावळ उपाध्यक्ष- प्रभाकर कदम, पवन मावळ संघटक- ऋषिकेश पांडे,
नाणे मावळ युवक संघटक- अजय गुरव. वारकरी संप्रदाय मुख्य प्रमुख- काळुराम देशमुख. वारकरी संप्रदाय प्रमुख- मारुती देशमुख.
वारकरी संप्रदाय युवा प्रमुख- दर्शन घनवट, यश घनवट, सदस्य- पांडुरंग शिंदे, रमेश जाधव, नवनाथ शिंदे, नितीन गुरव.

छायाचित्र: LON25B04267

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com