लोणावळ्यात यंदाही विक्रमी पाऊस
लोणावळा, ता. १५ : लोणावळ्यात मागील दोन दिवसांपासून पाऊस सुरूच आहे. या वर्षी मे पासून सुरू असलेला पाऊस अद्यापही थांबलेला नाही. त्यामुळे हवाहवासा पाऊस आता नकोसा वाटू लागल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
लोणावळा परिसरात गेल्या आठवड्यात पावसाने तीन दिवस उघडीप दिली होती. जोर काहीसा कमी असल्याने नागरिक सुखावले होते. मात्र, दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. कामे होत नसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. सोमवारी सकाळी १६ मिमी पावसाची नोंद झाली. लोणावळा हे पावसाचे आगर मानले जाते. परिसरातील खंडाळा, कुसगाव बु., कार्ला परिसरातही सातत्याने पाऊस होत आहे. यामुळे नदी-नाले प्रवाहित असून, इंद्रायणी नदीदेखील तुडुंब भरली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी लोणावळ्यात सहा हजार ६१३ मिलिमीटर (२३६.७३ इंच)
लोणावळ्यातील पाऊस (कंसात इंच)
यंदा १५ सप्टेंबरपर्यंत : ५,६८६ मिलिमीटर (२२३.८६)
गेल्या वर्षी १५ सप्टेंबरपर्यंत : ५,५२३ मिलिमीटर (२१७.४४)