

लोणावळा, ता. १५ : आई एकविरेचे माहेरघर असणाऱ्या देवघर गावचे ग्रामदैवत आई एकविरेचा भाऊ श्री काळभैरवनाथ देवस्थान यांचा काळभैरव जयंती उत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला. ‘श्रीं’चा अभिषेक व आरती, माऊली भजनी मंडळ यांचे भजन व कीर्तनकार जगन्नाथ महाराज पाटील यांची कीर्तन सेवा झाली. समस्त ग्रामस्थ, काळभैरवनाथ ट्रस्ट, बांधकाम कमिटी, उत्सव कमिटी यांनी हा महोत्सव संपन्न करण्यासाठी परिश्रम घेतले.
जगन्नाथ महाराज पाटील म्हणाले, ‘‘आपापसांतील मतभेद, द्वेष, तंटे बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येत उत्साहात उत्सव साजरा करण्यासाठी काळभैरवनाथ देवाने सर्वांना कौलच दिलेला आहे, देवघर हे आई एकविरेचे माहेरघर आहे. त्यामुळे माहेर श्रीमंत असल्यामुळे देवघरातील लोकांना काही कमी पडणार नाही.’’