लोणावळा नगरपालिकेसाठी
भाजपचे २२ उमेदवार जाहीर

लोणावळा नगरपालिकेसाठी भाजपचे २२ उमेदवार जाहीर

Published on

लोणावळा, ता. १६ : लोणावळा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपने नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदासाठी एकूण २२ उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा केली. माजी नगरसेवक गिरीश कांबळे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत.
नगरपालिकेत १३ प्रभागांमध्ये २७ जागा आहेत. यातील १२ प्रभागांमध्ये २२ जणांची नावे जाहीर करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. सोमवारी (ता. १७) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. प्रभाग क्रमांक आठमधून इच्छुक असलेल्या जय घोणे यांनी बाळा भेगडे, माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव, शहराध्यक्ष अनिल गायकवाड, श्रीधर पुजारी, पारिजा भिलारे, विजय मोरे, अमित गवळी, अरविंद कुलकर्णी, रामविलास खंडेलवाल, देविदास कडू, राजाभाऊ खळदकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
प्रभागनिहाय उमेदवार ः क्रमांक १ : शुभांगी गिरीगोसावी (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), सुधीर पारिठे (सर्वसाधारण). २ : दीपिका इंगुळकर (सर्वसाधारण महिला). ३ : अश्विनी लाड (सर्वसाधारण महिला). ४ : छाया मंगेश आमले (सर्वसाधारण), मीनाक्षी गायकवाड (अनुसूचित जाती महिला). ५ : ब्रिंदा गणात्रा (सर्वसाधारण महिला), सुभाष डेनकर (सर्वसाधारण). ६ : रेश्मा अर्जुन पाठारे (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), दत्तात्रय येवले (सर्वसाधारण). ७ : सुरेखा नंदकुमार जाधव (सर्वसाधारण महिला), देविदास कडू (नागरिकांचा मागास प्रवर्ग). ८ : जय किशोर घोणे (अनुसूचित जाती), अनिता काळे (सर्वसाधारण महिला). ९ : अंजली संजय जेधे (अनुसूचित जाती महिला), आशिष बुटाला (सर्वसाधारण). १० : अश्विनी नंदकुमार जाधव (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), शैलेश अनंता गायकवाड (सर्वसाधारण). ११ : रचना सिनकर (अनुसूचित जमाती महिला), शौकत शेख (सर्वसाधारण). १२ : विजया वाळंज (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), अभय अशोक पारख (सर्वसाधारण).
-----

Marathi News Esakal
www.esakal.com