लोणावळ्यात महिलांची मतदानात आघाडी

लोणावळ्यात महिलांची मतदानात आघाडी

Published on

लोणावळा, ता. ४ : यंदाच्या नगरपरिषद निवडणुकीत महिलांनी मतदानात आघाडी घेत पुरुषांना मागे टाकले आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत तसेच पुरुषांच्या यंदाच्या मतदानाच्या तुलनेत महिलांची उपस्थिती अधिक असल्याचे चित्र पाहायला मिळाले. निवडणूक विभागाकडून मिळालेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार, पुरुषांचे मतदान १७,१६२ इतके असताना महिलांचे मतदान १७,३४९ इतके नोंदले गेले. म्हणजेच यंदा महिलांची मतदानाची टक्केवारी पुरुषांपेक्षा जास्त राहिली. एकूण ३४,५११ मतदारांनी मतदान करून ७१.३४ टक्के इतकी टक्केवारी नोंदवली.
गेल्या निवडणुकीत महिला मतदारांची उपस्थिती तुलनेने कमी होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत महिलांची सक्रियता वाढली असून, सकाळपासूनच विविध केंद्रांवर महिलांची रांग दिसून आली. विशेषतः प्रभाग क्रमांक १/३, तुंगार्ली प्रभाग क्रमांक २ मध्ये महिलांनी उच्चांकी मतदान केले. या केंद्रांवर मतदानाचा टक्का सरासरी ८५ टक्के नोंदला गेला. तर भांगरवाडी प्रभाग क्रमांक ६, गवळीवाडा प्रभाग क्रमांक १०, नांगरगाव प्रभाग क्रमांक ५, खंडाळा गावठाण प्रभाग क्रमांक ११ येथे सरासरी ७२ टक्के महिलांनी मतदान केले.
विश्लेषकांच्या मते, महिलांचा वाढलेला सहभाग हा प्रभावशील असून, अनेक प्रभागांत निकालांवर महिलांचे मतदान निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

लोणावळा नगरपरिषद निवडणूक प्रभागनिहाय मतदान
क्रमांक ः पुरुष ः महिला ः एकूण ः टक्केवारी
१ : ११८९ ः११३६ ः २३२५ ः ७९.३७
२ : ११६६ ः११९७ ः २३६३ ः ८३.२०
३ : १३१२ ः१२५५ ः २५६७ ः ७१.४४
४ : १२९४ ः१२५८ ः २५५२ ः ६८.८६
५ : ११९९ ः१२३७ ः २४३६ ः ७४.०४
६ : १३०७ ः१३२५ ः २६३२ ः ७१.३२
७ : १२७४ ः१३०७ ः २५८१ ः ६६.५२
८ : १४३७ ः१४९९ ः २९३६ ः ६२.६६
९ : १५१४ ः१५७१ ः ३०८५ ः ६७.७२
१०: १००३ ः१००० ः २००३ ः ६२.६५
११: १५७३ ः१५९० ः ३१६३ ः ७७.४२
१२: १०७५ ः१११४ ः २१८९ ः ६९.९१
१३: १८१९ ः१८६० ः ३६७९ ः ७६.७७
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com