मोबाईल-सोशल मीडियाचा अतिरेक घातक

मोबाईल-सोशल मीडियाचा अतिरेक घातक

Published on

लोणावळा, ता. २६ ः ‘‘मोबाईलचा अतिवापर, सोशल मीडियावर होणारी वेळेची नासाडी, आळस, अपुरी झोप, गोंगाट, दूरचित्रवाहिनीचा अतिरेक, पालकांमधील कलह व ताणतणाव यामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता व स्मरणशक्ती कमी होते. त्यामुळे अशा शत्रूंपासून दूर राहणे अत्यंत गरजेचे आहे,’’ असा सल्ला प्रा. विभावरी सूर्यवंशी यांनी दिला.
लोणावळा येथील कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, वलवण येथे विद्यार्थ्यांसाठी ‘परीक्षेला सामोरे जाताना’ या विषयावर मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत परीक्षेची भीती दूर करून योग्य नियोजन, नियमित सराव आणि सकारात्मक दृष्टिकोनातून यश कसे मिळवता येईल, याबाबत प्रा. सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख होते. मार्गदर्शन करताना प्रा. सूर्यवंशी यांनी बोर्ड परीक्षांच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका वारंवार सोडवणे, अभ्यासाचे नियोजन करून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे, तसेच वेळेचे योग्य व्यवस्थापन करणे किती आवश्यक आहे, यावर भर दिला. नियमित सराव, सकारात्मक विचारसरणी आणि कुटुंबातील सहकार्यपूर्ण वातावरण याचा लाभ विद्यार्थ्यांना होतो, असे आवाहनही त्यांनी केले. या वेळी प्रा. संजय साळुंखे यांनी ‘खूप अभ्यास करूनही आठवत नाही’ किंवा ‘परीक्षेची भीती वाटते’ अशा समस्या आत्मविश्वास वाढवून, पुनरावृत्ती करून, योग्य झोप घेऊन, संतुलित आहार आणि सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारून दूर करता येतात, असे स्पष्ट केले. या कार्यशाळेला विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. रूपाली गवळी आणि प्रा. रोहित राणे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. पराग कुलकर्णी यांनी केले, तर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. धनराज पाटील यांनी आभार मानले.

छायाचित्र: LON25B05035
छायाचित्र: LON25B05036

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com