वाकसई येथे किराणा दुकानदारावर धारदार शस्त्राने हल्ला
लोणावळा, ता. २ : वाकसई, मावळ येथील किराणा दुकानदारावर दोन अज्ञात इसमांनी धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना रविवारी (ता. १) सायंकाळी घडली. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कैलास दिलीप जगताप (वय- ३५, रा. वाकसई, मावळ) यांनी फिर्याद दिली असून ते वाकसई, लोणावळा येथे ‘जगताप किराणा स्टोअर्स’ नावाने दुकान चालवतात. त्यांच्या फिर्यादीनुसार, ‘‘रविवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दुकानात दोन अनोळखी इसम आले. सुरुवातीला वाद झाल्यानंतर त्या दोघांनी अचानक धारदार शस्त्राने फिर्यादीवर हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या वेळी भांडणे सोडविण्यासाठी आलेले फिर्यादी यांचे चुलत भाऊ उमेश जगताप यांच्यावरही धारदार शस्त्राने वार करत हल्ला करत त्यांनाही जखमी केले.
स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत त्यांना प्रथम यश हॉस्पिटल, लोणावळा येथे दाखल केले. पुढील उपचारासाठी त्यांना नंतर परमार हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता अन्वये दोन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

