

लोणावळा, ता. ६ : पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळा शहरात तातडीच्या वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याने नगरपालिकेतर्फे तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांसह ‘कार्डियाक ॲम्बुलन्स’ (हृदयरोग रुग्णवाहिका) उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी लोणावळा महिला मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले.
याप्रसंगी महिला मंडळाच्या अध्यक्षा मनीषा बंबोरी, उपाध्यक्षा मेधा वैद्य, सचिव प्रतिमा खळदकर, खजिनदार सुनीता रावण, सहखजिनदार श्रुतिका राणे तसेच महिला मंडळाच्या सल्लागार अश्विनी धारप उपस्थित होत्या. लोणावळ्यामध्ये आजही अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असे मोठे रुग्णालय उपलब्ध नाही. एखादा गंभीर प्रसंग उद्भवल्यास किंवा हृदयविकारासारखा आपत्कालीन वैद्यकीय प्रश्न निर्माण झाल्यास रुग्णांना उपचारासाठी थेट पुणे किंवा मुंबई गाठावे लागते. या प्रवासात जाणारा वेळ रुग्णाच्या जिवावर बेतू शकतो. ही बाब लक्षात घेऊन, शहरात सर्व सोयींनी युक्त ‘कार्डियाक’ रुग्णवाहिका असणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत महिला मंडळाने व्यक्त केले.
महिला मंडळाच्या या मागणीला नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘नगरपालिका प्रशासनाची देखील अशी सुविधा पुरवण्याची तयारी आहे,’ असे आश्वासन त्यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.