शालेय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत 
लोणावळ्याच्या खेळाडूंना यश

शालेय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत लोणावळ्याच्या खेळाडूंना यश

Published on

लोणावळा, ता. ६ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या अंतर्गत तसेच महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन व ॲमेच्युअर पॉवरलिफ्टिंग असोसिएशन, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा सातारा येथील श्रीमंत शाहू महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे उत्साहात झाल्या. त्यात लोणावळा येथील व्ही. पी. एस. हायस्कूल व डी. पी. मेहता ज्युनिअर कॉलेज, तसेच डॉ. बी. एन. पुरंदरे हायस्कूलमधील शिवदुर्ग फिटनेसच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत विशेष ठसा उमटवला.
या स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरलेला ‘स्ट्रॉंग वूमन ऑफ महाराष्ट्र’ हा मानाचा किताब तपस्या अशोक मते हिने पटकावला. १७ वर्षांखालील मुलींच्या तपस्या अशोक मते हिने ५२ किलो वजन गटात तर प्रीती निवृत्ती दुडे हिने ४७ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकाविले. ज्ञानेश्वरी साबळे ६९ किलो वजन गटात चतुर्थ क्रमांक मिळविला. १९ वर्षांखालील मुलांमध्ये जागृत भेसानिया याने ६६ किलो वजन गटात कांस्यपदक तर निशांत कंधारे याने ५९ किलो वजन गटात पाचवा क्रमांक मिळविला.
या सर्व खेळाडूंना व्ही. पी. एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षिका रेवती बोके तसेच एशियन चॅम्पियन ज्योती कंधारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सर्व खेळाडू शिवदुर्ग फिटनेस येथे अशोक मते यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करीत आहेत. दरम्यान, तपस्या मते आणि प्रीती दुडे यांची शालेय राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाल्याने त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

छायाचित्र: LON26B05202
सातारा : शालेय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सहभागी शिवदुर्ग फिटनेसचे खेळाडू.

Marathi News Esakal
www.esakal.com