अल्पवयीन मुलीची आत्महत्या; कुसगावमध्ये तिघांविरुद्ध गुन्हा

अल्पवयीन मुलीची आत्महत्या; 
कुसगावमध्ये तिघांविरुद्ध गुन्हा
Published on

लोणावळा, ता. ११ : मावळ तालुक्यातील कुसगाव बुद्रुकमध्ये एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला. यश उर्फ गजानन जगदीश राऊत, शुभम उर्फ सोन्या जगदीश राऊत व जगदीश महादेव राऊत अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (पॉक्सो) २०१२ च्या कलम १२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. यश वारंवार मुलीचा पाठलाग करायचा. इतर मुलांशी तिचे नाव जोडून तो बदनामी करायचा असा आरोप आहे. या त्रासाला कंटाळून तसेच आठ मार्चला शिवीगाळ, दमदाटी व मारहाण झाल्याने मुलगी मानसिकरीत्या खचली होती. त्यामुळे तिने १० मार्चला दुपारी सुमारे १ ते १.४५ वाजण्याच्या दरम्यान राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com