फळांच्या मागणीत आणि भावात दहा टक्के वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फळांच्या मागणीत आणि भावात दहा टक्के वाढ
फळांच्या मागणीत आणि भावात दहा टक्के वाढ

फळांच्या मागणीत आणि भावात दहा टक्के वाढ

sakal_logo
By

मोशी, ता. २ : उन्हाळ्याचा तडाखा वाढू लागल्याने फळांची मागणी वाढू लागली आहे. मागील आठवड्यापेक्षा ही आवक १० टक्क्यांनी वाढली आहे. त्याचबरोबर भावातही १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. फळभाज्यांची आवक स्थिर असून भावही स्थिर आहेत. मात्र पालेभाज्यांची आवक मागील आठवड्यापेक्षा १५ टक्क्यांनी वाढली असून भावातही १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मोशीतील श्री नागेश्वर महाराज उपबाजार रविवारी (ता. २) पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर २२ हजार ५००, मेथी १९ हजार २००, पालक ३ हजार ९००, पुदिना १ हजार ५००, कांदापात २ हजार ६००, पालक ३ हजार ९०० आदी पालेभाज्यांची एकूण ४५ हजार ५०० जुड्या पालेभाज्यांची आवक झाली आहे.
फळभाज्यांमध्ये टोमॅटो ५००, बटाटा ४४७, कांदा २२९, फ्लॉवर २८३ , वाटाणा ३३, कोबी १६४ , काकडी २१३ आदी फळभाज्यांची एकूण आवक २ हजार ६३१ क्विंटल आवक झाली. ही आवक स्थिर असून भावही स्थिर आहेत.

शेती माल आवक :
* फळभाज्या एकूण आवक : २ हजार ७७५ क्विंटल
* बाजार भाव एक किलोचे (रुपयांमध्ये)
कांदा : गोल्टा : १४ ते १५, चांगला : १६ ते १८, बटाटा : २० ते २२, आले : ८० ते ९०, भेंडी : ६० ते ७०, गवार : ६० ते ७०, टोमॅटो : १८ ते २०, मटार : ६० ते ६५, घेवडा : ५० ते ५५, दोडका : ५० ते ५५, घोसाळे : ५० ते ५५, मिरची काळी लवंगी : ८० ते ९०, ज्वाला : ८५ ते ९०, मोठी लांब मिरची : ६० ते ७०, ढोबळी : ६० ते ७०, भोपळा : दुधी : ४० ते ५०, लाल : ४० ते ५०, भुईमूग : ६० ते ७०, काकडी : ५० ते ५५, कारली : ४० ते ४५, गाजर : ४० ते ४५, पापडी : ४० ते ४५, पडवळ : ३५ ते ४०, फ्लॉवर : ५० ते ६०, कोबी : ४५ ते ५०, वांगी : ४० ते ४५, सुरण : ४० ते ५०, तोंडली जाड : ३० ते ४०, तोंडली लहान : ४० ते ४५, बीट : ४० ते ४५, कोहळा : ४० ते ४५, पावटा : ५० ते ६०, वाल : ५० ते ६०, वालवर : ४५ ते ५०, शेवगा : ८० ते ९०, चवळी : ४० ते ४५, मका कणीस : ८ ते १०, लिंबू : १८ ते २०

* पालेभाज्या एकूण आवक : ४५ हजार ५०० जुड्या
बाजार भाव एका जुडीचा (रुपयांमध्ये)
कोथिंबीर : ११ ते १२, मेथी : ११ ते १२, शेपू : ११ ते १२, कांदा पात : १२ ते १३, पालक : ११ ते १२, मुळा : १० ते १२, चवळी : ९ ते १०, करडई : ८ ते १०, राजगिरा : १० ते १२, चाकवत : ८ ते १०, अंबाडी : १० ते १५,

फळे एकूण आवक : १ हजार ५५३ क्विंटल
बाजार भाव एका किलोचे (रुपयांमध्ये)
हापूस आंबा : ४ ते ६ डझनाची पेटी : ४ ते ६ हजार रुपये.
सफरचंद : परदेशी : १२० ते १३०, रॉयल : १४० ते १५०, काश्मीर : ११० ते १२०, पिअर : १०० ते ११०, किवी : ६० ते ७० एक बॉक्स, मोसंबी : ९० ते १००, संत्री परदेशी : ९० ते १००, महाराष्ट्र : ८० ते ९०, डाळिंब : ९० ते १००, पेरू : ७० ते ८०, अंजीर : ८० ते ९०, पपई : ५० ते ५५, कलिंगड : ५० ते ६०, चिकू : ५० ते ५५, सीताफळ : ६० ते ७०, केळी : ३० ते ३५, सोनकेळी : ९० ते १००, आलुबुकार : १२० ते १३०, शहाळे : ४० ते ४५, अननस : ७० ते ८०, आवळा : ५० ते ६०, ड्रॅगन फ्रूट : १४० ते १५० रु.