‘जाधववाडी लिंक रस्ता येथे स्वच्छतागृह उभारा’

‘जाधववाडी लिंक रस्ता येथे 
स्वच्छतागृह उभारा’

मोशी, ता. २ : जाधववाडी ते बोऱ्हाडेवाडी येथील वुड्सविले गृहनिर्माण संस्था रस्त्यावर महिला व पुरुषांसाठी सुसज्‍ज स्वच्छतागृहाची उभारणी करा, अशी मागणी येथील वुड्सविले गृहनिर्माण संस्थेतील सभासदांसह स्थानिक नागरिकांनी केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेच्या वतीने अनेक ठिकाणी महिला व पुरुषांसाठी सुसज्ज अशी स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात आली आहे. सध्या जाधववाडी, बोऱ्हाडेवाडी या भागाचा वेगाने विस्तार होत आहे. असंख्य गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या असून, येथे हजारो नागरिक राहावयास आहेत. येथील परिसरात बसथांबे, भाजी मार्केट, मच्छी मार्केट, बाजारपेठा मोठ्या प्रमाणावर आहेत. याठिकाणी विविध कारणांसाठी नागरिकांची मोठ्या संख्येने ये-जा सुरू असते. मात्र, या परिसरात एकही स्वच्छतागृह नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. विशेषतः महिलांची मोठी कुचंबणा होते. त्यामुळे या परिसरातील जाधववाडी लिंक ते वुड्सविले या रस्त्यावर अद्ययावत स्वच्छतागृहाची उभारणी करण्याची मागणी फेडरेशन अध्यक्ष प्रमोद वाळुंज, सचिव नीलिमा मेमाणे, जे इमारत खजिनदार अरुण कोल्हे, बजाबा देवकर, भारती गाडेकर आदींनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com