
मोशी, ता. १ : येथील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बलराज पाटील हे होते.
रायभान जाधव, रवींद्र आंबेकर, सुभाष कुलकर्णी, रामभाऊ बोरकर यांनी लोकमान्य टिळकांचे जीवन कार्यावर प्रकाश टाकला. शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य निर्मिती व संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील त्यांचा सक्रिय सहभाग विस्ताराने सांगितला. माझी मैना गावाकडे राहिली ही फक्कड सुभाष कुलकर्णी यांनी गाऊन वातावरणात चैतन्य आणले. दोन मिनिटे उभे राहून दोन्हीही नेत्यांना अभिवादन केले. कार्यक्रमासाठी प्रल्हाद पाटील, चंद्रकांत कुंभार, नारायण बोरसे, विजय देशमुख, बाळासाहेब भालेकर, विजय देशिंग, दशरथ जाधव, दत्तात्रेय कदम, नवनीत सोनार, तुळशीराम बोराडे, महादेव पिसे आदी उपस्थित होते.