पिंपरी-चिंचवड
विकास अनाथ आश्रमात निराधार मुलांसमवेत रक्षाबंधन
मोशी, ता. १० : वंचित घटकांतील मुलांसोबत रक्षाबंधन हा सण साजरा करण्याच्या उद्देशाने मानवाधिकार कल्याण संघटना, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट फेडरेशन लिमिटेड, चिखली मोशी शाखेच्यावतीने
विकास अनाथाश्रमात अनाथ मुलांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले.
हा रक्षाबंधन आम्ही अनाथाश्रमातील अद्भुत मुलांसोबत साजरा केला. राख्या बांधून आणि हास्य वाटून त्यांनी आम्हाला आठवण करून दिली की सर्वात मजबूत बंधने नेहमीच रक्ताची नसून प्रेम आणि करुणेची असतात,
अशी भावना फेडरेशनचे विजय महाजन यांनी व्यक्त केली. यावेळी किशोर थोरात, भगवान वायकर, महेंद्र शेळके, स्वप्नील झांबरे, विनायक जगताप, मारुती तमवार, आशिष कदम, दीपक पवार, वैभव हेंद्रे, रसिका झांबरे, अर्चित महाजन, सक्षम वायकर आदी सदस्य उपस्थित होते.
MOS25B03822