मोशीतील उद्यानात शेकडो रोपांचा मूक आक्रोश
मोशी, ता. ५ : अनेक महिन्यांपासून मोशी प्राधिकरणातील पेठ क्रमांक सहा मधील पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आवार उद्यानात शेकडो रोपे पडून आहेत. पाणी-खतांच्या अभावामुळे त्यांचा जीव अक्षरशः गुदमरून जात आहे. काही रोपे कोमेजली असून काहींच्या मुळांचा विकासच थांबला आहे. तर काही सुकून चालली आहेत.
वृक्षारोपण म्हणजे केवळ एक उपक्रम नव्हे; तर वृक्षारोपणानंतर त्या वृक्षांचे संगोपनही आवश्यक आहे. वृक्ष म्हणजे केवळ सजावट नव्हे; तर ते जीवनाचा श्वास आहेत, असे म्हटले जाते.
आरटीओ आवारातील उद्यानात अनेक प्रकारची रोपे लावलेली आहेत. त्यांची पूर्ण वाढ होऊन त्यांचे मोठ्या वृक्षांमध्ये रुपांतरही झाले आहे. मात्र त्याचवेळी वृक्षारोपणासाठी आणलेली शेकडो रोपे तशीच येथे पडून आहेत. काळ्या प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये ती पडून राहिल्याने त्यांची वाढ खुंटली आहे. हीच रोपे येथील रस्त्यांच्या दुतर्फा, शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात किंवा सोसायटीत वाटप करून लावली असती; तर ती मोठ्या झाडांच्या रूपात उभी राहिली असती, अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली. ही रोपे जपण्यासाठी प्रशासनाने तातडीने ती योग्य ठिकाणी लावावीत व नागरिकांनाही ‘एक रोप, एक जबाबदारी’ अभियानात सहभागी करून घ्यावे, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे.
झाडांची देखभाल करण्यासाठी प्रशासनाकडे निधी असतो. पण, रोपे लावण्याऐवजी गवतामध्येच पडून आहेत. हे दुर्दैवी आहे. त्यांची लवकरात लवकर देखभाल करावी. तसेच योग्य ठिकाणी रोपण करुन काळजी घ्यावी.
- सचिन देशमुख, स्थानिक नागरिक
MOS25B03995, MOS25B03997
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

