मोशी प्राधिकरणामध्ये संकल्प मॅरेथॉन उत्साहात
मोशी, ता. २ : येथील संकल्प लाड शाखीय वाणी समाज मंडळाच्यावतीने मोशी प्राधिकरण येथे एक पाऊल आरोग्यासाठी... एक संकल्प उज्ज्वल भविष्यासाठी या उपक्रमाअंतर्गत आयोजित संकल्प मॅरेथॉन उत्साहात पार पडली.
मोशी प्राधिकरणातील छत्रपती श्री संभाजी महाराज पुतळ्याला मानवंदना देऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर मॅरेथॉनपूर्वी सर्व स्पर्धकांकडून वॉर्म-अप कवायती घेण्यात आल्या तसेच नियमित व्यायाम व आरोग्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर स्पर्धकांच्या हस्ते फुगे आकाशात सोडून मॅरेथॉनची औपचारिक सुरुवात करण्यात आली. मॅरेथॉन मार्गावर विविध आरोग्यविषयक जनजागृतीपर फलक लावण्यात आले. त्यातून निरोगी जीवनशैलीचा प्रभावी संदेश देण्यात आला.
संकल्प मंडळातर्फे प्रत्येक स्पर्धकाला मॅरेथॉन किट देण्यात आले. मॅरेथॉन पूर्ण झाल्यानंतर सर्वांसाठी पौष्टिक व सात्विक नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. या उपक्रमामुळे समाजात आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

