कचराकुंडी म्हणून पदपथाचा वापर
मोशी, ता. ५ : मोशीतील बोराटे वस्ती ते जाधववाडी लिंक रस्त्यावरील पदपथावर काही नागरिकांकडून घरातील वापरून झालेल्या फर्निचरसारख्या काही टाकाऊ वस्तू सर्रास फेकल्या जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे पदपथ कचराकुंडीमध्ये रूपांतरित झाला आहे.
कचराकुंडी किंवा घंटागाडी उपलब्ध असतानाही तेथे कचरा टाकण्याची मानसिकता नसणे ही चिंतेची बाब आहे. महापालिकेने स्वच्छता राखण्यासाठी मोठा खर्च केला तरी नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे परिसर अस्वच्छ होत आहे. प्रशासनाने जाणीवपूर्वक शहर घाण करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. घरातील कचरा अंगणात टाकत नाही. मग, सार्वजनिक ठिकाणी अशा टाकाऊ वस्तू फेकण्याचा अधिकार नागरिकांना कोणी दिला, असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

