मोशी प्राधिकरणातील अतिक्रमणे तत्काळ हटवा
मोशी, ता. १० : मोशी प्राधिकरणातील सेक्टर क्र. ११ व १३ मधील उड्डाणपुलाखाली तसेच सीएनजी गॅस पंपालगतच्या रस्त्यावरील मोठ्या प्रमाणातील अतिक्रमणे तत्काळ हटवावी, अशी मागणी चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. आठ दिवसांत कारवाई न झाल्यास मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
उड्डाणपुलाखाली हातगाड्या, टपऱ्या, छोटे-मोठे हॉटेल्सची मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाले असून, त्यामुळे वाहतूक कोंडी, अस्वच्छता आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत आहे. नियोजित शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या रस्त्यावर संध्याकाळी मोठ्या प्रमाणात भाजीविक्रेते व हातगाड्या लावल्या जात असल्याने नागरिकांना ये-जा करणे कठीण झाले आहे. प्रभाग क्रमांक ८ व २ मधील रस्त्यांवरील सर्व अतिक्रमणे त्वरित हटवावीत, अशीही मागणी करण्यात आली.
क्रांती चौकातील अतिक्रमणे हटविण्याबाबत ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाचे प्रभाग अधिकारी तथा अतिक्रमण विभाग प्रमुख अजिंक्य येळे यांच्याशी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. यावेळी भाजप मंडल अध्यक्ष शिवराज लांडगे, फेडरेशनचे उपाध्यक्ष संदीप कुंभार, संदीप तांदळे आदी उपस्थित होते.
नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आम्ही अत्यंत गांभीर्याने घेतला आहे. महानगरपालिकेने दिखाऊ नव्हे तर कायमस्वरूपी कारवाई करावी. नागरिकांना दिलासा मिळेपर्यंत फेडरेशनचा लढा सुरूच राहील.
- संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

