श्री जगन्नाथ रथयात्रेमध्ये हजारो भाविकांचा सहभाग
रावेत, ता.२९ ः इस्कॉन, रावेतच्यावतीने श्री जगन्नाथ रथयात्रेचे रविवारी भव्य आयोजन करण्यात आले. हजारो भक्तांच्या उपस्थितीत ही रथयात्रा भक्तिभाव, सांस्कृतिक परंपरा आणि आध्यात्मिक एकात्मतेचे प्रतीक ठरली.
रथयात्रेची सुरुवात आकुर्डी येथील श्री विठ्ठल मंदिरापासून झाली. श्री जगन्नाथांची महाआरती झाल्यानंतर नारळ अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते रथाला औपचारिक सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमोद कुटे, कैलास कुटे, राज्य आदिवासी विकास महामंडळाचे आयुक्त राजेंद्र भारुड, महेंद्र खंडेलवाल आदी उपस्थित होते.
म्हाळसाकांत चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, बिजलीनगर पूल, धर्मराज चौक मार्गे मार्गक्रमण करत रावेत येथील इस्कॉन मंदिरामध्ये रथयात्रेचा समारोप झाला. रथयात्रेच्या समारोपानंतर इस्कॉन मंदिरात भगवान श्री जगन्नाथांची महाआरती करण्यात आली. भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी इस्कॉन, रावेतचे अध्यक्ष जगदीश गौरांग दास म्हणाले, ‘‘या रथयात्रेचा उद्देश म्हणजे सर्व भाविकांनी एकत्र येत सलोख्याचे वातावरण निर्माण करणे आणि भगवान श्री जगन्नाथांच्या दर्शनाचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचवणे होय. ही परंपरा ओडिशातील जगन्नाथ पुरी येथील ऐतिहासिक रथयात्रेच्या धर्तीवर जगभरातील इस्कॉन केंद्रांमध्ये दरवर्षी साजरी केली जाते.’’
PNE25V27262
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.