शिक्षक होऊन विद्यार्थ्यांनीच रावेतच्या शाळेत केले ज्ञानदान
रावेत, ता. ९ ः रावेत येथील मनपा शाळा क्र. ९७ मध्ये इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने शिक्षक दिन साजरा केला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतः शिक्षकांची भूमिका साकारत ज्ञानदानाचा अनुभव घेतला.
या कार्यक्रमात शौर्य तोंडे याने मुख्याध्यापकाची; तर ज्ञानेश्वरी घोलप हिने उपमुख्याध्यापकाची भूमिका उत्तमरीत्या साकारली. आदिनाथ महानोर, मृण्मयी अडसरे, ईश्वरी टेकाळे, राधिका चौधरी, समृद्धी शेळके यासह अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका निभावत विद्यार्थ्यांना शिकवले. त्यामुळे शिक्षकांच्या जबाबदाऱ्या व अध्यापनाची खरी जाणीव झाली. आजचा दिवस आमच्यासाठी अविस्मरणीय ठरला, अशी भावना शिक्षक झालेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
शिक्षक सूरज गायकवाड यांनी नियोजन केले. मुख्याध्यापक सायरा शिकलगार, शर्मिला समुद्र यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सुचिता आसोदे, दीपाली शिंपी, शीतल रासकर, केतकी पाटेकर, सोनाली ढुमणे, विद्या खुरंगे, राजश्री जाधव यांचे सक्रिय सहकार्य लाभले.
विद्यार्थ्यांनी घेतलेला हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. यामुळे त्यांच्यात नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि शिस्तीची जाणीव निर्माण होईल.
- सायरा शिकलगार, मुख्याध्यापिका
NGI25B00830