किवळे शाळा क्र. ९६ मध्ये पालकांसाठी पाककला प्रदर्शन
रावेत, ता. ११ ः राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त रावेत-किवळे येथील शाळा क्र. ९६मध्ये पालकांसाठी विशेष पाककला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामागील मुख्य उद्देश मुलांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या संतुलित आहाराचे महत्त्व पटवून देणे, तसेच पालकांना पोषणयुक्त खाद्यपदार्थांच्या नव्या संकल्पना देणे हा होता.
यावेळी पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. त्यांनी घरच्या घरी तयार करता येणारे पौष्टिक व चवदार पदार्थ सादर केले. यात कडधान्यांपासून बनवलेले स्नॅक्स, हिरव्या भाज्यांचे सूप, विविध धान्यांचा वापर करून तयार केलेले पदार्थ, कमी तेल-मसाल्याचा वापर करून बनवलेले आरोग्यवर्धक खाद्यपदार्थ आणि मुलांच्या आवडीच्या पदार्थांमध्ये पोषक घटकांची सांगड कशी घालावी, याचे उत्कृष्ट नमुने पाहायला मिळाले.
मुख्याध्यापक सरस्वती भेगडे म्हणाल्या, ‘‘संतुलित आहारामुळे मुलांचा शारीरिक तसेच मानसिक विकास योग्य प्रकारे होतो. आजच्या फास्टफूडच्या युगात पालकांनी घरगुती आरोग्यदायी पदार्थांना प्राधान्य दिल्यास मुलांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल.’’
या प्रदर्शनात सादर झालेल्या प्रत्येक पदार्थांसोबत त्यातील पोषणमुल्यांची माहिती देण्यात आली. मुलांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या प्रथिने, जीवनसत्त्वे, तंतुमय पदार्थ, कॅल्शिअम यांचा आहारात कसा समावेश करावा, याबाबत पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रदर्शनानंतर पालक व शिक्षकांमध्ये मुक्त संवाद साधण्यात आला. या माध्यमातून मुलांच्या दैनंदिन आहारात लहान परंतु महत्त्वपूर्ण बदल करून त्यांना अधिक आरोग्यदायी आणि निरोगी जीवनशैलीकडे वळवण्याचा संदेश देण्यात आला.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.