चेंबर फुटल्याने दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर
रावेत, ता. २० ः रावेत परिसरातील डी. वाय. पाटील ध्यानशांती शाळेजवळील चेंबर मागील चार दिवसांपासून भरून वाहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
शेकडो विद्यार्थी शाळेत येतात. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच हे चेंबर असल्याने विद्यार्थ्यांच्या ड्रॉप आणि पिकअपसाठी होणारी गर्दी अधिक धोकादायक ठरत आहे. या ठिकाणी दुर्गंधीमुळे श्वास घेणेही कठीण झाले आहे.
पालक व नागरिकांनी महापालिकेकडे संताप व्यक्त केला आहे. शाळेजवळ अशा प्रकारे चेंबर वाहणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका आहे. त्वरित स्वच्छता करून कायमस्वरूपी उपाय करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या समस्येविषयी सारथी ॲपवर कळविण्यात आले आहे. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. तीन महिन्यांपूर्वीही असेच चेंबर फुटून पाणी रस्त्यावर आले होते. त्यावेळीही तीन-चार दिवस उशिराने काम झाले होते.
-सचिन सिध्ये, नागरिक
तक्रार आली आहे, तातडीने पथक पाठवितात आले असून चेंबर साफ करण्यात येईल. तसेच पुन्हा समस्या उद्भवू नये यासाठी आवश्यक दुरुस्ती करण्यात येईल.
-प्रसाद संकपाळ, कनिष्ठ अभियंता ड्रेनेज विभाग महापालिका