रावेतच्या महापालिका शाळेत पोषण आहार सप्ताह उत्साहात
रावेत, ता. २७ ः ‘सुपोषित भारत - सक्षम भारत’ या संकल्पनेला अधोरेखित करत पिंपरी चिंचवड महापालिका शाळा क्र. ९७ येथे पोषण आहार सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसोबतच पालकांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्याला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाला शिक्षिका मनिषा सदावर्ते विशेष उपस्थित होत्या. मुख्याध्यापिका सायरा शिकलगार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वी पार पडला. यावेळी जयश्री जाधव, शर्मिला समुद्र, राजश्री जाधव, चारूशीला जाधव, अर्चना ओहोळ, सुचिता आसोदे, पांडुरंग घुगे, विद्या खुरंगे, सूरज पाटेकर, सोनाली ढुमणे आदींनी मोलाचे सहकार्य केले.
स्पर्धेमध्ये विविध पालकांनी पौष्टिक तसेच चविष्ट पदार्थ सादर केले. परीक्षकांनी पाक कलेतील सादरीकरण आणि पौष्टिक मूल्य यांच्या आधारे निकाल जाहीर केला. त्यामध्ये सुप्रिया तोंडे - तवा चाट (प्रथम क्रमांक), वर्षा पोळ, मटकी मूग भेळ (द्वितीय क्रमांक), सोनी शेख - रंगीत भात व रबडी (तृतीय क्रमांक) आणि झोया हसन शेख - फ्रूट कस्टर्ड व पनीर पुलाव (चतुर्थ क्रमांक) यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. तसेच सहभागी सर्व पालकांना प्रोत्साहनपर भेटवस्तू देण्यात आल्या.