कृतिप्रधान उपक्रमांतून निसर्ग संवर्धन, जनजागृती

कृतिप्रधान उपक्रमांतून निसर्ग संवर्धन, जनजागृती

Published on

सुबोध गलांडे : सकाळ वृत्तसेवा
निगडी ता. ६ : आपला रोजचा नोकरी-उद्योगव्यवसाय सांभाळून निसर्गातील घटकांचे जतन करण्याचा ध्यास घेतलेल्या तरुणांची संघटना म्हणजे ‘निसर्गराजा मित्र जीवांचे’. फक्त वृक्षलागवडीपुरते मर्यादित न राहता या संघटनेने समाजातील विविध घटकांतील लोकांना आकर्षित करणारे पर्यावरणपूरक उपक्रम मागील १७ वर्षांपासून सातत्याने सुरू ठेवले आहेत.
पर्यावरण म्णजे केवळ झाडे नव्हेत; त्यामध्ये मोठी झाडे, पशु-पक्षी, कीटक, वन्यजीव, समुद्री जीव तसेच हवा, नदी, जल आणि मृदा प्रदूषण यांसारख्या सर्व घटकांचा समावेश होतो. या सर्व घटकांचा समतोल राखणे अत्यावश्यक असल्याने, ‘निसर्गराजा मित्र जिवांचे’ संस्था या दिशेने नानाविध जनजागृती व कृतिप्रधान उपक्रम राबवत आहे. वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन हे संस्थेचे प्रमुख उपक्रम असून, रोपवाटिका चालवून रोपांचे मोफत वाटप केले जाते. ‘ग्रीन कॅम्पस’ उपक्रमाअंतर्गत शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये जैवविविधता उद्यान, वृक्षपरिचय फलक आणि पर्यावरण विषयक कार्यशाळा घेतल्या जातात. वृक्ष परिचय, वन्यजीव परिचय आणि निसर्गसंवाद या डिजिटल उपक्रमांद्वारे लाखो लोकांपर्यंत निसर्गविषयक माहिती पोहोचवली जाते. प्लॅस्टिकमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी ‘प्लेट बँक’ उपक्रम राबवून सण-समारंभात स्टील भांडी वापरण्यास प्रोत्साहन दिले जाते. तसेच रक्तदान शिबिरे, महिला सबलीकरण उपक्रम, जैवविविधता संवर्धन, फुलपाखरू उद्यान निर्मिती, बियाणे संकलन व रोपवाटप असे अनेक सामाजिक-पर्यावरणपूरक उपक्रम वर्षभर सुरू असतात.
संस्थेतील सर्व सभासद आपली काम सांभाळूनही निसर्गरक्षणाचे कार्य निष्ठेने व निरंतरपणे करीत आहेत. त्यात प्रामुख्याने सागर वाघ, राहुल घोलप, माणिक धर्माधिकारी, श्रियाल साळुंखे, ज्ञानेश्वर वेदपाठक, मारुती साळुंखे , तुषार जाधव , किरण घोटकुले, रमेश कदम, अभिजित बुधले, अतुल वाघ, अमरदीप बाबर देसाई, वैभव बाबर देसाई, मनोज चौधरी, संभाजी वाघमारे, किरण घोटकुले त्यांचे कुटुंबीय सहकार्य करत आहेत.


विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण देण्यासाठी विविध शाळांमध्ये लॅपटॉपचे वितरण या वर्षीपासून करण्यात येत आहे. या उपक्रमांमुळे ‘निसर्गराजा मित्र जिवांचे’ संस्था पर्यावरण रक्षणाबरोबरच समाजात जबाबदारीची आणि संवेदनशीलतेची भावना निर्माण करण्याचे कार्य करत आहे.
- संभाजी वाघमारे, अध्यक्ष, ‘निसर्गराजा मैत्र जिवांचे’ संघटना

९३३२८१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com