पिंपरीत बुधवारपासून ''व्हेरॉक कप'' स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरीत बुधवारपासून ''व्हेरॉक कप'' स्पर्धा
पिंपरीत बुधवारपासून ''व्हेरॉक कप'' स्पर्धा

पिंपरीत बुधवारपासून ''व्हेरॉक कप'' स्पर्धा

sakal_logo
By

पिंपरी, ता. १ : युवा खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी पीसीएमसीज् व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीतर्फे नववर्षाच्या सुरवातीला बारा वर्षाखालील मुलांच्या ''व्हेरॉक कप'' एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ४ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत यजमान व्हेरॉक वेंगसरकर ॲकॅडमीच्या दोन संघासह ऑल स्टार क्रिकेट ॲकॅडमी, एच. के. बाऊन्स ॲकॅडमी, आर्यन्स क्रिकेट ॲकॅडमी, ओमसाई क्रिकेट ॲकॅडमी, स्पार्क स्पोर्ट्स ॲकॅडमी, सहारा क्रिकेट ॲकॅडमी, परंडवाल क्रिकेट ॲकॅडमी, स्पोर्टिव्ह क्रिकेट ॲकॅडमी, कॅनॉन क्रिकेट ॲकॅडमी, कोकाटे क्रिकेट ॲकॅडमी, स्कोअर स्पोर्ट्स ॲकॅडमी, गॅरी कर्स्टन ॲकॅडमी, पेस अॅथलेटिक्स ॲकॅडमी आणि अचिव्हर्स क्रिकेट ॲकॅडमी या सोळा संघांचा समावेश आहे. संपूर्ण स्पर्धा एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या नियमानुसार खेळण्यात येईल. सुरवातीला चार गटात साखळी सामने होतील व गुणानुक्रमे चार अव्वल संघांमध्ये उपांत्यफेरीचे सामने होतील. अंतिम सामना दोन फेब्रुवारी रोजी होईल. थेरगाव येथील मैदानावर बुधवारी (ता.४) स्पर्धेचे उद्घाटन होईल. प्रत्येक सामना ४५ षटकांचा असेल. प्रत्येक सामन्यातील सामनावीरांना व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक व मालिकावीर ठरलेल्या खेळाडूंना, उपविजेता व विजेत्या संघाला चषक देऊन गौरविण्यात येईल. फेब्रुवारी (ता.२) भारतीय संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होईल, वेंगसरकर क्रिकेट ॲकॅडमीचे प्रशिक्षक डॉ. विजय पाटील यांनी दिली.