घोलप विद्यालयामध्ये स्नेहसंमेलन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घोलप विद्यालयामध्ये 
स्नेहसंमेलन उत्साहात
घोलप विद्यालयामध्ये स्नेहसंमेलन उत्साहात

घोलप विद्यालयामध्ये स्नेहसंमेलन उत्साहात

sakal_logo
By

जुनी सांगवी, ता. १५ : सांगवी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबूरावजी घोलप प्राथमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, माजी नगरसेवक शिवाजी पाडुळे तसेच मुख्याध्यापक बाळकृष्ण मापारी, उपमुख्याध्यापिका संजना आवारी, प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका मनीषा वळसे याप्रसंगी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीसे देऊन गौरविण्यात आले.
प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हिंदी मराठी गाण्यांवर सुंदर असे कलाविष्कार नृत्य सादर केले. आय लव्ह माय इंडिया, पशू पक्षांचे गाणे, देशभक्ती गीत, शेतकरी गाण्यावर नृत्य, लावण्या, लेझीम थीम, वो कृष्णा है अशा एकाहून एक सरस बहारदार गाण्यांवर नृत्यांचा आविष्कार सादर करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमास माधुरी शेलार, अर्चना धुमाळ, रेखा गायकवाड, सारिका शिंदे, शीतल चव्हाण, अलका जगताप उपस्थित होते. संजय मेमाणे, शरद शेळके यांनी सूत्रसंचालन केले. मनीषा वळसे यांनी आभार मानले.


फोटो ः 14890