गुन्हेवृत्त 
लाच मागितल्याप्रकरणी  
रावेतमध्ये गुन्हा दाखल

गुन्हेवृत्त लाच मागितल्याप्रकरणी रावेतमध्ये गुन्हा दाखल

पिंपरी, ता. ८ : रावेत येथील सोसायटीच्या जागेची नोंद सात-बारा उताऱ्यावर करण्यासाठी किवळे तलाठी कार्यालयातील मदतनीसाने ३५ हजार रुपये लाचेची मागणी केली. या प्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नितीन ढमाले असे गुन्हा दाखल केलेल्या मदतनीसाचे नाव आहे. ३३ वर्षीय तरुणाने देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रावेत येथील सोसायटीच्या जागेची नोंद सात-बारा उताऱ्यावर करण्यासाठी ढमाले याने किवळे तलाठी यांच्यासाठी लाचेची मागणी केली होती.
तक्रारदार तरुणाने याप्रकरणी पुणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दाखल केली. एसीबीच्या पथकाने या तक्रारीची पडताळणी केली असता, ढमाले याने तक्रारदाराबरोबर चर्चा करून ३५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, ढमाले याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
------

कोयते मिरवत टोळक्याची दहशत
हातात कोयते घेऊन आलेल्या चार जणांच्या टोळक्याने पिंपरीतील एका चायनीज हॉटेलमध्ये शिरून दहशत पसरवली. त्यानंतर गल्ल्यातील दीड हजाराची रोकड लुटून पसार झाल्याची घटना पिंपरीतील मासुळकर कॉलनीत घडली.
बालकृष्ण जीतमान श्रेष्ठ (रा. अजमेरा, पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे त्यांच्या मासुळकर कॉलनी येथील चायनीज हॉटेलमध्ये साफसफाई करत होते. यावेळी आरोपी दुचाकीवरून आले. त्यांच्या हातात कोयते, तलवार, कुऱ्हाड होती. ही हत्यारे मिरवत त्यांनी शिवीगाळ करून बालकृष्ण यांच्यासह कामगारांना धमकी देत दहशत निर्माण केली. तसेच, हॉटेलच्या गल्ल्यातून दीड हजारांची रोकड काढून पसार झाले.
--------------------------

मोटारीची दीड लाखाचे पिस्तूल लंपास

मोटारीमध्ये ठेवलेले दीड लाख रुपये किमतीचे पिस्तूल चोरल्याची घटना निगडीतील प्राधिकरण येथे घडली.
पवन मनोहरलाल लोढा (रा. प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी लोढा यांच्याकडे परवानाधारक पिस्तूल आहे. त्यांनी ते पिस्तूल एका बॅगमध्ये ठेवून बॅग मोटारीत ठेवली. त्यांनी मोटार घरासमोर पार्क केली होती. रात्रीच्या वेळी चोरट्याने मोटारीच्या दरवाजाची काच खाली करून, बॅगमधून दीड लाखाची पिस्तूल व पाच जिवंत काडतुसे चोरून नेली.
--------------------------

लिफ्टच्या बहाण्याने तरुणाला लुटले

तरुणाला दुचाकीवर लिफ्ट दिल्यानंतर रस्त्यात थांबवून दोघांनी त्याच्याकडील रोकड व मोबाईल लुटला. चोरट्यांसोबत झालेल्या झटापटीत तरुण जखमी झाला. हा प्रकार चिंचवड येथे घडला.
प्रथमेश मनोरंजन जोशी (वय ३२, रा. कामिनी हॉटेल, अहिंसा चौक, चिंचवड, मूळ - इंदोर) याने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी लिफ्ट मागितली असता, आरोपींनी त्यांच्या दुचाकीवरून लिफ्ट दिली. महावीर चौकाजवळील ब्रीजवर येताच आरोपींनी दुचाकी थांबवली. जोशी यांच्या खिशातील मोबाईल व दहा हजाराची रोकड असा १४ हजार रुपयांचा ऐवज लुटून पसार झाले. चोरट्यांसोबत झालेल्या झटापटीत फिर्यादी जखमी झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com