
सांगवीत उद्यापासून कीर्तन महोत्सव
जुनी सांगवी, ता. १३ ः येथे महाशिवरात्रीनिमित्त महादेव आळी गावठाण महादेव मंदिर परिसरात बुधवारपासून (ता. १५) कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कीर्तन सप्ताहात भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज माळी, प्रकाश महाराज बोधले, चैतन्य महाराज वाडेकर, शंकर महाराज शेवाळे, बबन महाराज बहिरवाल यांची सायंकाळी कीर्तन सेवा होणार आहे. तर सांप्रदायिक गजनी भारूड संगीत सोंगी विनोदी समाज प्रबोधन व जनजागृतीपर कीर्तन करणार आहेत. या सप्ताहात विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळ, दुर्गादेवी महिला भजनी मंडळ, कृष्णाजी महिला भजनी मंडळ, बालयोगी नंदकुमार महाराज महिला भजनी मंडळ, सद्गुरू भजनी मंडळ, माऊली महिला भजनी मंडळ, भवानी माता भजनी मंडळ, कलावती महिला भजनी मंडळ, जयमाला नगर भजनी मंडळ, महादेव महाराज टेंभूकर व समस्त ग्रामस्थ सांगवी गाव भजनी मंडळ भजन सेवा करणार आहेत.