सांगवीत दापोडी परिसरात महाशिवरात्री उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांगवीत दापोडी परिसरात महाशिवरात्री उत्साहात
सांगवीत दापोडी परिसरात महाशिवरात्री उत्साहात

सांगवीत दापोडी परिसरात महाशिवरात्री उत्साहात

sakal_logo
By

जुनी सांगवी, ता. १८ ः जुनी सांगवी दापोडी परिसरात महाशिवरात्री उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. महादेव मंदीर परिसर, माहेश्वरी चौक शिवमुर्ती, संगमनगर संगमेश्वर मंदीर, दापोडी गावठाण महादेव मंदिर येथे भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. खिचडी, केळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

महादेव आळी गावठाण महादेव मंदिर ः
मंदिर परिसरात बुधवार (ता.१५) पासून किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या किर्तन सप्ताहात भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज माळी, प्रकाश महाराज बोधले, चैतन्य महाराज वाडेकर, शंकर महाराज शेवाळे, बबन महाराज बहिरवाल यांची किर्तन सेवा झाली. सांप्रदिक गजनी भारूड, संगीत सोंगी विनोदी समाज प्रबोधन व जनजागृतीपर किर्तन झाले.

दापोडी शिवकालीन महादेव मंदिर ः
होमहवन व महाआरती करण्यात आली. संतोष महाराज सांगळेकर यांच्या कीर्तनाचे किर्तन झाले. सकाळी अनिकेत रमेश काटे, निखिल वंजारी, नीलेश बलकवडे, नागेश पिरजादे यांच्या हस्ते होम हवन करण्यात आले. एस.एम.एस. कॉलनी येथे श्री शिवशंभो महादेव प्रतिष्ठान यांच्यावतीने माजी नगरसेवक संजय काटे व संतोष काटे, यांच्या हस्ते होम हवन पूजा करण्यात आली. माहेश्वरी चौकात कै. दत्तात्रय भोसले प्रतिष्ठान व शिवामृत कट्टा यांच्या तर्फे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. विजयसिंह भोसले व अर्चना भोसले यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी मारुती जाधव, प्रवीण भोसले, संतोष ढोरे, महेश आंबे अविनाश इंदलकर आदि उपस्थित होते.