Fri, March 31, 2023

पी. के. इंटरनॅशनलमध्ये मराठी भाषा दिन उत्साहात
पी. के. इंटरनॅशनलमध्ये मराठी भाषा दिन उत्साहात
Published on : 28 February 2023, 8:33 am
पिंपळे सौदागर, ता. २८ : पी. के. इंटरनॅशनल स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. आपल्या पुढील पिढीने मराठी भाषेचे संवर्धन करावे, म्हणून मराठी भाषा दिन साजरा केला जातो. कुसुमाग्रज महाराष्ट्राचे लाडके साहित्यकार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, थोर लेखक, नाटककार म्हणून ओळखले जातात. कुसुमाग्रजांनी अनेक सरस कथा, कादंबऱ्या, निबंध, लघुकथा, नाटक, कविता यांचे लेखन केले. मराठी दिनाचे महत्त्व शिक्षक प्राची गण व अनघा दाबके यांनी विद्यार्थ्यांना दिली. यावेळी शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे, उपप्राचार्या धनश्री सोनवणे यांच्यासह शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिषा गांगर्डे व भक्ती लव्हेकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रज्ञा गायकवाड यांनी केले.