
गुन्हे वृत्त
६८ हजाराचे साहित्य लंपास
पिंपरी, ता. १ : देहूरोड येथील आर्मी हेडक्वार्टर जवळ असलेल्या स्टोअर रूममधून चोरट्यांनी ६८ हजार ५०० रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले.
रामकृष्णा जनार्दनराव हडपा ( रा. आर्मी क्वार्टर्स, देहूरोड) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. देहूरोड येथील सिग्नल रेजिमेंट
आर्मी स्टेशन हेड क्वार्टर जवळ केटी लाइन्स बिल्डिंगमध्ये आर्मीचे स्टोअर रूम आहे. या रूमच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी आतील ६८ हजार ५०० रुपये किमतीचे साहित्य लांबवले.
-------
तरुणीचा पाठलाग करीत गैरवर्तन
पिंपरी, ता. १ : तरुणीचा पाठलाग करत तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्यावर चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी २० वर्षीय तरुणीने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सनी लोखंडे (रा.रुपीनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी तरूणीकडे आरोपी सनीने प्रेमाची मागणी केली. त्याला तरुणीने नकार दिला. तरीही सनी तरुणीचा पाठलाग करीत तरुणीशी गैरवर्तन केले.