
श्री सिध्दचक्र महामंडळ पूजा सांगवीत संपन्न
जुनी सांगवी, ता. ९ ः श्री १००८ भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर येथे श्री सिद्धचक्र महामंडळ विधान पूजेचे आयोजन केले होते. यावेळी जैन धर्मातील जोडप्यांनी एकत्र पूजन केले. सांगवी परिसरात पहिल्यांदाच ही पूजा करण्यात आली. मंदिरातील व जैन धर्मातील योगगुरू यांनी हे पूजन केले. सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रम झाले. यावेळी १०८ आदीसागर अंकलीकर महाराज, प्रथमाचार्य प.पू. १०८ श्री. शांतीसागरजी महाराज, संतशिरोमणी आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महाराज यांचे पूजन करण्यात आले. २७ फेब्रुवारी ते ७ मार्च असा हा मांडलिक कार्यक्रम झाला. अभिषेक शांतीधारा, मौजबंधन, विधान प्रारंभ, महामस्तकाभिषेक, कलश अभिषेक व शेवटच्या दिवशी विसर्जन कार्यक्रम झाला. भगवंतांचा पालखीतून विहार व भव्य रथोत्सव काढण्यात आला होता. पूजेस जैन व इतर धर्मीय नागरिकांनी उपस्थिती लावली. यावेळी मंदिराच्या अध्यक्षा पुष्पा पाटील, सचिव चंद्रकांत काळे, खजिनदार कुबेर देसाई, उपस्थित होते.