बोपोडी ब्रम्हाकुमारी विश्व विद्यालयात महिला दिन साजरा- | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोपोडी ब्रम्हाकुमारी विश्व विद्यालयात महिला दिन साजरा-
बोपोडी ब्रम्हाकुमारी विश्व विद्यालयात महिला दिन साजरा-

बोपोडी ब्रम्हाकुमारी विश्व विद्यालयात महिला दिन साजरा-

sakal_logo
By

जुनी सांगवी,ता.९ ः प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या बोपोडी शाखेत महिला दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर, सांस्कृतिक, मनोरंजन व आध्यात्मिक कार्यक्रम झाले. कार्यक्रमास गडद अंधार फेम आकाश कुंभार, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पाटोळे, भूमाता ब्रिगेडियरच्या संस्थापक तृप्ती देसाई उपस्थित होते.
देसाई म्हणाल्या, ‘‘महिलांनी अधिक सशक्त होणे ही काळाची गरज आहे. कौटुंबिक, सामाजिक, विविध क्षेत्रात महिला उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. महिला दिन केवळ एकच दिवस साजरा करण्यापेक्षा प्रत्येक दिवशी आपल्या घरातील महिलांना सन्मान देऊन साजरा करावा.’’

ब्रह्मा कुमारी लक्ष्मी दीदी यांनी प्रास्ताविक केले.