विणकर बांधवांच्या
प्रश्नांबाबत बैठकीत चर्चा

विणकर बांधवांच्या प्रश्नांबाबत बैठकीत चर्चा

जुनी सांगवी, ता. १० ः देवांग कोष्टी समाजातील विणकर बांधवांच्या वतीने पिंपळे निलख मधील चौंडेश्वरी मंदिर येथे बैठक पार पडली. समाजातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी समाज हिताचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी तसेच अनेक मागण्या मान्य करण्यासाठी एकमताने बैठकीत निर्णय घेण्यात आला. यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व विणकर बंधू समाजाचे प्रतिनिधी एकत्रित येऊन निवेदन सादर करण्याचे निश्चित करण्यात आले.
बैठकीत विणकरांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणे, आरक्षणासाठी ठोस अंमलबजावणी, वस्त्रोद्योगविषयी प्रश्न निकालात काढणे, वीज बिल अनुदान मिळणेबाबत, पश्चिम महाराष्ट्रातील होतकरू युवकांकरिता उद्योग व्यवसायासाठी अनुदान मिळणे, वस्त्रोद्योगकरिता शासनाकडून कमी व्याज दराने भांडवली पत पुरवठा मिळवणे आदी मागण्या मान्य करण्यासाठी निवेदन सादर करून प्रश्न शासन दरबारी मांडण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले.
याबाबत सर्व संघटना व पदाधिकारी, महाराष्ट्रातील बांधवांनी निवेदन सादर करण्यासाठी एकत्रित येऊन सर्वांनी मिळून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील आदी शासकीय अधिकारी यांना देणार असल्याचे तसेच याबाबत पाठपुरावा करणार असल्याची माहिती देवांग कोष्टी समाज अध्यक्ष सुरेश तावरे यांनी दिली.
या वेळी भारतीय कोष्टी समाज अध्यक्ष अरुण वरुडे, महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळ अध्यक्ष अंकुश उकार्डे, विश्वनाथ मुसळे, संजय कांबळे, पंडितराव इदाते, विजयाताई वाघ, अरविंद तापोळे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com