युनिक स्किल डेव्हलपमेंट सेंटर मार्फत
गरजू विद्यार्थ्यांना प्रशिक्षण

युनिक स्किल डेव्हलपमेंट सेंटर मार्फत गरजू विद्यार्थ्यांना प्रशिक्षण

पिंपरी, ता. ३ ः बजाज कंपनीच्या सीएसआर उपक्रमाअंतर्गत पिंपरी-चिंचवड भागातील अठरा ते तीस वयोगटातील गरीब व गरजू मुला-मुलींसाठी विविध व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण युनिक स्किल डेव्हलपमेंट सेंटर (USDC) मार्फत देण्यात येत आहे.
यामध्ये मोबाईल रिपेअरिंग, इलेक्ट्रिशियन, एसी व रेफ्रिजरेटर मेकॅनिक, पीसीबी असेंब्ली ऑपरेटर, फायनान्शियल अकौंटिंग, ऑफिस अॅडमिनिस्ट्रेशन, कॉम्प्युटर ऑपरेटर अशा विविध कोर्सेस उपलब्ध आहेत. येत्या १५ मे पासून जानकीदेवी बजाज समाज सेवा केंद्र, आकुर्डी या ठिकाणी अभ्यासक्रमांना सुरुवात होणार आहे. तसेच, काही अभ्यासक्रम युनिक स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या चिंचवड शाखेत होणार आहेत. सर्व समाज घटकातील कोणीही या कोर्समध्ये भाग घेऊ शकतो.

तरी पिंपरी-चिंचवड शहरातील युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जानकीदेवी बजाज समाज सेवा केंद्र, आकुर्डी किंवा युनिक स्किल डेव्हलपमेंट सेंटर, चिंचवड या केंद्रावर भेट द्यावी तसेच ९८२२०८५२५८ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com