बारणे आणि वाघेरे यांच्या खर्चांत तफावत

बारणे आणि वाघेरे यांच्या खर्चांत तफावत

निवडणूक विभागाची माहिती; उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची, आज तिसरी तपासणी

पिंपरी, ता. १० : मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची तिसरी तपासणी शनिवारी (ता. ११) सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात होणार आहे. दरम्यान, शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या निवडणूक खर्चात दोन लाख रुपये आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या निवडणूक खर्चात‌ ३७ हजार ४०९ रुपये तफावत आढळली आहे.
आकुर्डी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या इमारतीत मावळ लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय आहे. उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली आणि दुसरी तपासणी अनुक्रमे तीन व सात मे रोजी निवडणूक खर्च निरीक्षक सुधांशू राय यांच्या उपस्थितीत आणि निवडणूक खर्च तपासणी प्रमुख अश्विनी मुसळे आणि सहाय्यक सविता नलावडे यांच्या नियंत्रणाखाली झाली आहे.
मावळ लोकसभा निवडणूक रिंगणात असलेल्या सर्व उमेदवारांनी पुढील तिसऱ्या तपासणीवेळी निवडणूक खर्चाचे लेखे मावळ लोकसभा मतदारसंघ, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील निवडणूक खर्च नियंत्रण कक्ष येथे न चुकता सादर करणे बंधनकारक आहे. भारत निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे उमेदवारांनी सादर केलेला खर्च तपासला जात असून, उमेदवारांच्या प्रचार खर्चाची मर्यादा रक्कम ९५ लाख रुपये एवढी आहे. उमेदवारांनी रोजचा प्रचार खर्च नोंदविणे आवश्यक आहे. दैनंदिन खर्च तपासणीवेळी खर्च अहवाल सादर न करणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार नोटीस बजावण्यात येत आहे. ज्या उमेदवारांच्या दैनंदिन खर्चामध्ये तफावत आढळेल त्यांना देखील नोटीस बजावली जाते. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अधिनस्त खर्च व्यवस्थापन कक्ष, फिरते भरारी पथक, स्थिर संनियंत्रण पथक, व्हिडिओ संनियंत्रण पथक, व्हिडिओ पाहणारे पथक आदी विविध पथके कार्यरत आहेत, असे निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्षाच्या वतीने सांगण्यात आले.

मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण ३३ उमेदवार निवडणूक लढवत असून, त्यांच्या दररोजच्या खर्चाचे लेखे आणि खर्चाच्या पावत्या या लेखांकन पथकाकडे जमा केल्या जात आहेत. त्याचवेळी व्हिडिओ नियंत्रण व पाहणाऱ्या पथकाकडून आलेल्या अहवालानुसार शॅडो रजिस्टरमध्ये उमेदवाराचा रोजचा प्रचारखर्च नोंदवला जात असून इतर पथकांकडून रोकड अथवा इतर जप्ती झाल्यास त्याचीही नोंद घेतली जात आहे.
- दीपक सिंगला, निवडणूक निर्णय अधिकारी, मावळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com