वळवाच्या पावसाने सांगवीला झोडपले

वळवाच्या पावसाने सांगवीला झोडपले

जुनी सांगवी, ता.११ ः जुनी सांगवी परिसरात शुक्रवार (ता.१०) दुपारी चारच्या सुमारास मेघगर्जनेसह आलेल्या वळीवाच्या पावसाने सांगवी परिसराला झोडपले. सुमारे तासभर पडलेल्या पावसाने रस्त्यांवरून पाणी वहात होते. अनेक ठिकाणी सखल रस्त्यांवर पाणी तुंबल्याने नागरिकांना पाण्यातून वाट काढत घर गाठावे लागले.
महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून काही ठिकाणी दुरुस्ती कामे सुरू असून काही कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, जिथे दुरुस्त्या झाल्या नाहीत तेथे सकाळी चाकरमानी मंडळी इतर नागरिकांना तुंबलेल्या पाण्यातून वाट काढत मार्गक्रमण करावे लागले. श्रीकृष्ण मठासमोरील पवना नदी किनारी सखल रस्त्यावर पाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी तुंबत असून नागरिकांना पाण्यातूनच वाहने दामटत वाट काढावी लागली. सांगवी-दापोडी रस्ता व सांगवी गावठाण- संविधान चौक असे दोन रस्ते एकत्र येतात. गावठाण परिसरात श्रीराम मंदिर, श्रीकृष्ण मठ, महादेव मंदिर असल्याने परिसरात मोठी वर्दळ असते. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंतही येथील दुरुस्ती कामे झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात आला.
वळवाच्या पहिल्याच मोठ्या पावसात ममतानगर गल्ली क्रमांक तीन व चार या गल्ल्यांमधून पाणी तुंबल्याने रहिवाशांना कसरत करत घर गाठावे लागले. सखल भाग पावसाळी पाण्याचा नियोजनाचा अभाव यामुळे अंतर्गत गल्ल्यांमधून पाणी तुंबले जात असल्याचे नागरिकांनी सांगितले.

भाजी विक्री मैदानाचे झाले तळे
जुनी सांगवी येथील मध्यवर्ती भागात असलेल्या गजानन महाराज मंदिरासमोरील मैदान परिसरात पाणी तुंबल्याने एका बाजूच्या मैदानावर पाणी साचून तळे झाले होते. या मैदानावर भाजी विक्रेत्यांकडून भाजी विक्री करण्यात येते. समोर शाळा, करसंकलन कार्यालय, अभ्यासिका केंद्र आहे. येथील अर्ध्या भागात सिमेंटचे पेव्हींग ब्लॉक लावण्यात आलेले आहेत. तर अर्धा भाग जैसे थे ठेवण्यात आलेला आहे. येथे स्थापत्य विभागाकडून पाणी निचरा होण्यासाठी भूमिगत वाहिनी टाकण्यात आलेली आहे. मात्र, चिखल, माती इतर कचरा अडकून राहिल्यास पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नसल्याने मोठ्या पावसात पाणी तुंबून या परिसराला तळ्याचे स्वरूप येते.

पहिल्याच मोठ्या पावसात ठिकठिकाणी पाणी तुंबल्याने नागरिकांना पाण्यातून वाट काढत घर गाठावे लागले.
- अनिल गायकवाड, रहिवासी, ममतानगर

सांगवी गावठाण, पवना नदी किनारा रस्ता, गजानन महाराज मंदिर परिसरात पाणी साचून राहिल्याने भाजी विक्रेते व नागरिकांना पाण्यातून वाट काढत कसरत करावी लागते.
- रूपेश पुजारी, नागरिक.

पाणी तुंबणाऱ्या ठिकाणी दुरुस्तीची कामे सुरू आहेत. स्थापत्य व आरोग्य विभागाच्या वतीने नालेसफाईची कामेही सुरू आहेत.
- प्रशांत कोटकर, अभियंता (स्थापत्य) ‘ह’ प्रभाग, पिंपरी चिंचवड महापालिका


ssociated Media Ids : PIM24B17863, PIM24B17864, PIM24B17865

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com