मासिक, सांस्कृतिक बैठकीसाठी विरंगुळा केंद्र हवे

मासिक, सांस्कृतिक बैठकीसाठी विरंगुळा केंद्र हवे

आशा साळवी - सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २३ ः चिंचवड-एम्पायर स्क्वेअरमधील ज्येष्ठांना एकत्र बसण्यासाठी, मासिक-साप्ताहिक बैठकीसाठी, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी स्वतंत्र विरंगुळा केंद्राची आवश्यकता आहे. त्यासाठी आजपर्यंत महापालिका स्तरावर विविध प्रयत्न केले गेले, परंतु दुर्दैवाने मागणीस यश आले नाही. सोसायटीच्या जागेत कार्यक्रम घेण्यासाठी पाच हजार रुपये मोजावे लागतात. विरंगुळा केंद्र ही आमची ही प्रमुख मागणी आहे. अशा एक ना अनेक समस्या एम्पायर स्क्वेअर ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी ‘सकाळ’च्या ‘संवाद ज्येष्ठांशी’ या उपक्रमात मांडल्या.

यावेळी अध्यक्ष सदानंद बोगम, उपाध्यक्ष सुवालाल मुथा, प्रवीण बागलाने, कोषाध्यक्ष विजय गुप्ता, कार्याध्यक्ष तुकाराम शेळके, सहकोषाध्यक्ष संजय साळुंके, विजय पाठक, सभासद प्रमोद गोयल, विलास सावे, शेखरबाबु घेवारे, रामकुमार अग्रवाल, विलायतीराम अग्रवाल, जगन्नाथ तरटे, मधुकर जोशी, संजय बिरारी, दीपक भोसले, रतिलाल देवधरे, बाबूराव पार्सेवार, राजाराम सायकर, अजय लढ्ढा, गुलाबराव बिरदवडे, विनीत कदम, प्रदीप मुथ्था, बाबूराव हंगे, राकेश काकरे, डॉ. राम अग्रवाल, स्वाती बारटक्के, सीमा जोशी, वर्षा पाठक, अनिता गुप्ता, शोभना बोगम आदी उपस्थित होते.

आकडे बोलतात
संघाची स्थापना
२२ सप्टेंबर २०२१
सभासद संख्या - १२०
महिला संख्या - ६४
पुरुष संख्या - ५६

संघाचे उपक्रम
- गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.
- महिला दिनानिमित्त महिलांचा सत्कार.
- एकदिवसीय सहलीचे आयोजन.
- कोजागरी पोर्णिमा उत्सव.
- संघाचा वर्धापन दिन.
- दर तीन महिन्यांनी एक कार्यक्रम
- व्याख्यान, प्रवचन, गायन
- वादन कथाकथन काव्यवाचन
- पंढरपूर-आषाढी वारी
- दिंडीचा सन्मान, वारकऱ्यांची सेवा
- वृक्षारोपण
- रामनवमी व श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा
- रक्तदान शिबिर व वैद्यकीय तपासणी शिबिर
- १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला प्रभात फेरी आणि ध्वजवंदन
- मतदार नोंदणी अभियान व जनजागृती.

ज्येष्ठांच्या समस्या
रतिलाल देवधरे म्हणाले, ‘‘एम्पायर उड्डाणपुलाखाली दोन्ही बाजूंनी अवजड वाहने उभी केली जातात. त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची कामे तिथेच केली जातात. संपूर्ण परिसर अस्वच्छ केला आहे.’’
सुवालाल मुथा म्हणाले, ‘‘एम्पायर स्क्वेअरपासून हायवेपर्यंतच्या पदपथावर नागरिक घाण (लघुशंका) करतात. त्यांच्यावर कारवाई करावी.’’
संजय साळुंके म्हणाले, ‘‘भटक्या कुत्र्यांपासून ज्येष्ठ, महिला आणि लहान मुलांना इजा पोचत आहे. कुत्र्यांचा महापालिकेने बंदोबस्त करावा.’’
संजय बिरारी म्हणाले, ‘‘महापालिकेने वैद्यकीय सुविधा पुरवाव्‍यात. व्हीलचेअर, प्रथमोपचार, स्ट्रेचर, बीपी शुगर मोजणी असे वैद्यकीय किट द्यावे.’’
दीपक भोसले म्हणाले, ‘‘आमच्या संघाला कायमस्वरूपी विरंगुळा केंद्राची व्यवस्था करावी.’’
बाबूराव पार्सेवार म्हणाले, ‘‘आरोग्य विम्याचे प्रीमीयम खूप महाग आहे. दंतचिकित्सा आणि दंत उपचारासाठी महापालिका प्रशासनाने मदत करावी.’’
राजाराम सायकर म्हणाले, ‘‘सरकारने आयुष्‍यमान कार्ड वाटप
करावे.’’
विनीत कदम म्हणाले, ‘‘ज्येष्ठ नागरिकांसाठी शासकीय किंवा स्थानिक प्रशासनाकडून विविध मदत पुरवावी.’’
स्वाती बारटक्के म्हणाल्‍या,‘‘महापालिकेने ज्येष्ठांना विविध योजना पुरविल्या पाहिजेत.’’

‘‘ज्येष्ठांसाठी सोसायटीत मंदिर बांधून देण्‍याचे आश्‍वासन बिल्डरकडून देऊनही अद्याप बांधले नाही. सोसायटीच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ व दुरुस्ती करणे आवश्यक आहे. भटकी कुत्री खूप असून लहान मुले व ज्येष्ठांवर हल्ले करतात. यासारखे अनेक समस्या असून दूर होणे गरजेचे आहे.’’
- सदानंद बोगम, अध्यक्ष, एम्पायर स्क्वेअर ज्येष्ठ नागरिक संघ

PNE24U21584

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com