वि.भा.पाटील पुलाच्या पदपथाची दुरूस्ती

वि.भा.पाटील पुलाच्या पदपथाची दुरूस्ती

जुनी सांगवी, ता.१ ः दापोडी - बोपोडीला जोडणाऱ्या वि.भा.पाटील पुलालगतच्या खचलेल्या पदपथाबाबत ‘सकाळ’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून तात्काळ दखल घेण्यात आली. मुरूम टाकून तेथील खड्डा बुजविण्यात आला. पुढील दुरुस्तीचेही काम करण्यात येणार असल्याचे स्थापत्य विभागाकडून सांगण्यात आले.
पुलाच्या सुरवातीस रस्त्याकडेला पदपथ खचून खड्डा पडला आहे. पावसाळ्यात येथे पाणी साचून अपघात घडण्याचा धोका होता. या खड्डयात कचरा साचून नागरिकांना मोकाट जनावरांचा उपद्रवही सहन करावा लागत होता. याबाबत ‘सकाळ’मधून त्याबाबतचे वृत्त छायाचित्रासह प्रसिद्ध करून पाठपुरावा केला होता. पावसाळा सुरु होण्यापूर्वी खड्ड्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी होती. स्थापत्य विभागाकडून दुरुस्ती करण्यात येत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या दुरुस्ती कामानंतर तेथे कचरा साठू नये यासाठी कचरा टाकण्याऱ्यांविरूद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. रस्त्याच्याकडे टाकण्यात येत असलेल्या कचऱ्याने मोकाट जनावरांचा वाहतुकीला अडथळा ठरत आहे.

तात्पुरत्या स्वरूपात मुरूम टाकून खड्डे दुरुस्ती करण्यात आली आहे. येथील पदपथाबाबत बांधकाम विभागाला माहिती देण्यात आली आहे. बांधकाम विभाग व स्थापत्य विभागाकडून येथील पुढील दुरुस्ती काम करण्यात येईल.
- श्याम सुंदर भंडारी, अभियंता (स्थापत्य) पिंपरी-चिंचवड महापालिका

या भागातील कचरा संकलन नियमित करण्यात येते. काही नागरिक रस्त्याकडेला कचरा टाकतात. नागरिकांनी कचरा गाडीतच द्यावा.
- सतीश पाटील, आरोग्य अधिकारी, ह प्रभाग कार्यालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com