पवना नदी किनारा रस्त्यावर गतिरोधकांअभावी अपघात

पवना नदी किनारा रस्त्यावर गतिरोधकांअभावी अपघात

Published on

जुनी सांगवी, ता. ३० ः पवना नदीच्या किनाऱ्यावरून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर दोन रस्ते एकत्र येत असल्याने सतत अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तेथे तत्काळ गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर आहे. अनेकवेळा दुचाकीस्वार व वाहनधारकांना वेगाने जात आल्यामुळे थेट समोरून येणाऱ्या वाहनांशी धडक होते. विशेषतः रात्रीच्यावेळी इथे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. विरूद्ध दिशेने वेगात येणाऱ्या वाहनांच्या अपघातांच्या घटनांत वाढ झाली आहे. या परिसरात तीन मंदिरे, उद्यान, नदीघाट, रहिवासी कॉलनी असून रहिवाशांबरोबरच व्यायामासाठी येणारे नागरिक या मार्गे सतत प्रवास करतात. त्यामुळे हा परिसर नेहमी गजबजलेला असतो.
सामाजिक कार्यकर्त्या उज्वला ढोरे म्हणाल्या,‘‘नवी सांगवी, पिंपळे गुरव या भागांत शाळेसाठी ये - जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. पावसाळ्याचे दिवस असल्याने अनेकदा विरूद्ध दिशेने वेगात येणारे दुचाकीस्वार गती कमी करत नाहीत. त्यामुळे वाहन घासणे, अपघात होणे, वादावादीचे प्रकार रोज घडत आहेत.’’
स्थापत्य विभागाचे अभियंता प्रशांत कोटकर म्हणाले,‘‘परिवहन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार येथे गतिरोधक बसविण्यात येईल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com