‘सकाळ’च्या वृत्तानंतर प्रशासनाला जाग
जुनी सांगवी, ता. १ : दरवर्षी पावसाळ्यात जुनी सांगवी येथील महादेव आळी ते संविधान चौकापर्यंत या मुख्य रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक ठरत होता. खड्डेपडून त्यात पाणी साचत असल्याने अपघाताच्या घटना घडत होत्या. या समस्येबाबत वृत्ताच्या माध्यमातून ‘सकाळ’ने नागरिकांचा आवाज प्रशासन दरबारी मांडला होता. याची दखल घेत महापालिका स्थापत्य विभागाकडून येथील खड्डे दुरुस्ती करण्यात आली आहे.
महादेव आळी ते संविधान चौकापर्यंत हा रस्ता अत्यंत रहदारीचा आहे. याशिवाय परिसरात बस प्रवासी थांबा, वेताळ महाराज मंदिर, रास्त भाव धान्य दुकान आणि शाळा असल्यामुळे सर्वच वयोगटातील नागरिकांची येथे वरदळ असते. पावसाळ्यात हा रस्ता धोकादायक ठरत असल्याने त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत होती. याबाबत ‘सकाळ’मधून ''जुनी सांगवीतील रस्ता रहदारीसाठी धोकादायक'', या शीर्षकाखाली शुक्रवारी ता. २९ वृत्त प्रसिद्ध केले होते. यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. खड्डे दुरुस्ती झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.