पिंपरी-चिंचवड
‘सांगवीत पार्किंगचे नियोजन करा’
जुनी सांगवी, ता.१० ः सांगवी परिसरातील रस्ते व बाजारपेठेतील दुकानांसमोर होणाऱ्या अवैध पार्किंगचे नियोजन करण्याबाबत सांगवी परिसर व्यापारी व रिपाइं (आठवले गट) यांच्यावतीने सांगवी वाहतूक विभागाला लेखी निवेदन देण्यात आले.
रिपाई युवक शहर अध्यक्ष धम्मरत्न गायकवाड, व्यापारी विजय यादव, भरत जैन, गौरव कर्नावट, डॉ. सूरज बांगर, डॉ. रोहन विश्वासराव, सतीश गुगळे, सतेज माने, सिद्धांत महाजन, जगदीश चौधरी, मिश्रीमा गेहलोत आदी यावेळी उपस्थित होते. सांगवीतील अनेक प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहनांची अवैधरीत्या पार्किंग केली जात आहे. या भागात पी १ व पी २ नियम लागू असतानाही त्यांचे पालन होत नाही. दोन्ही बाजूंनी वाहने उभी केल्याने रस्ता अरुंद होतो आणि वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे, असे त्या निवेदनात म्हटले आहे.