बालगिर्यारोहक साई कवडेची
कांगयात्से शिखरावर चढाई

बालगिर्यारोहक साई कवडेची कांगयात्से शिखरावर चढाई

Published on

जुनी सांगवी, ता. २७ ः येथील सोळा वर्षांचा बालगिर्यारोहक साई सुधीर कवडे याने नुकतीच लेह-लडाखमधील कांगयात्से शिखरावर (६०५० मीटर) यशस्वी चढाई केली आहे. ही मोहीम ‘द अल्पायनिस्ट’ संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. मोहिमेत एकूण १५ गिर्यारोहकांनी सहभाग घेतला होता.
कांगयात्से एक व कांगयात्से दोन ही दोन्ही शिखरे लडाखमधील मार्खा खोऱ्यात येतात. मोहिमेला लेह येथील शांती स्तूपाला भेट देऊन सुरुवात करण्यात आली. कांगयात्से दोन (६२५० मीटर) शिखरावर चढाईसाठी टीमचे रात्री १० वाजता बेस कॅम्पमधून प्रस्थान केले. साईने या शिखरावर ५७०० मीटरपर्यंत चढाई केली, तर इतर दहा सदस्यांनी प्रशिक्षक भगवान यांच्या मार्गदर्शनाखाली शिखरमाथा सर केले. शिखर सर केल्यानंतर सर्व सदस्य पुन्हा बेस कॅम्पकडे परतले. यानंतर एक दिवस विश्रांती घेऊन कांगयात्से एक (६४०० मीटर) या आणखी कठीण आणि तांत्रिक शिखरावर चढाई सुरू करण्यात आली. साधारण पाच ते सहा तासांच्या चढाईनंतर टीम कॅम्प एकपर्यंत पोहोचली.
साई कवडे हा लहानपणापासून गिर्यारोहणाच्या क्षेत्रात सक्रिय आहे. त्याचे सात खंडांतील सात सर्वोच्च शिखरे सर करून भारताचा तिरंगा फडकविण्याचे स्वप्न आहे. वयाच्या नवव्या वर्षी त्याने पहिली हिमालयीन मोहीम पूर्ण केली होती.

सर केलेली शिखरे
- किलीमांजारो (आफ्रिका)
- एल्ब्रुस (रशिया)
- एव्हरेस्ट बेस कॅम्प व काला पत्थर (नेपाळ)
- अकांकागुआ (दक्षिण अमेरिका)
- स्टोक कांग्री, फ्रेंडशिप, पतालसु (भारत)
- २०२२ मध्ये साईने एव्हरेस्ट मॅरेथॉन देखील यशस्वीरीत्या पूर्ण

अॅथलेटिक्समध्येही आघाडीवर
साई सध्या आदित्य कॉलेज, बाणेर येथे अकरावीत शिक्षण घेत आहे. तो बालेवाडीतील छत्रपती क्रीडा संकुलात ‘रेसिंग वॉरिअर्स क्लब’ येथे दत्ता झोडगे आणि श्याम दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तीन हजार मीटर धावण्याचा सराव करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com