पान एक सिंगल दोन बातम्या
‘स्वच्छता ही सेवा’ची
आज व्यापक मोहीम
पिंपरी, ता. २६ : महापालिकेच्या ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत शनिवारी (ता. २७) सकाळी आठ वाजता पिंपरीतील शगुन चौक, डीलक्स चौक, पिंपरी कॅम्प व रेल्वे स्टेशन रस्ता, साई चौक या परिसरात व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल. प्रारंभी स्वच्छतेची शपथ घेण्यात येईल. केंद्रीय सहकार व नागरी वाहतूक राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री तसेच पालकमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, नगरविकास राज्य मंत्री माधुरी मिसाळ उपस्थित असणार आहेत. या उपक्रमात शहरवासीयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
....
पदार्थ गाळे नोंदीसाठी
उद्या शेवटचा दिवस
पिंपरी, ता. २६ : महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत महिला व बालकल्याण योजनेंतर्गत आकुर्डी येथे ४८ खाद्यपदार्थ गाळे उभारण्यात आले आहेत. हे गाळे महिला बचत गटांना भाडेकराराने देण्यात येतील. त्यासाठी ई-लिलाव होईल. त्यासाठी नोंदणीची रविवारपर्यंत (ता. २८) मुदत आहे. दिव्यांग व आदिवासी महिला बचत गटांसाठी प्रत्येकी दोन, तृतीयपंथी व कोविड योद्धा महिला बचत गटांसाठी प्रत्येकी एक, इतर तीन व पीसीएमसी सक्षम अंतर्गत नोंदणीकृत महिला बचत गटांसाठी ४० गाळे आरक्षित आहेत. ई-लिलावात सहभागासाठी इच्छुक बचत गटांनी १० हजार रुपये सहभाग शुल्क व ५०० रुपये न परतावा नोंदणी शुल्कासह अर्ज सादर करणे आवश्यक आहे. सोबत बचत गटाची नोंदणी प्रमाणपत्रे, आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक, शॉप ॲक्ट लायसन्स व आवश्यक परवाने सादर करणे बंधनकारक आहे, असे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी कळविले आहे.
..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.