पिंपरी-चिंचवड
जुनी सांगवीत तुळशी विवाह उत्साहात
जुनी सांगवी, ता. ११ ः पारंपरिक पद्धतीने वैदिक मंत्रोच्चारात आणि भक्तिभावाच्या वातावरणात सांगवी येथे ‘सकाळ’ तनिष्का सदस्यांनी सामूहिक तुळशी विवाह सोहळा उत्साहात साजरा केला. तुळस आणि शालिग्राम पूजन केले. फुलांची सजावट केली होती. सनई-चौघड्यांच्या सुरात ओवाळणी, हळदी-कुंकू, अभिषेक केला. प्रसाद वाटप केले. तनिष्का गट प्रमुख कोमल गौडाडकर, शारदा नाईकरे, सुरेखा धोंगडे, सारिका धोंगडे, अस्मिता शेळके, वैष्णवी बारटक्के आदींनी संयोजन केले.

