जुनी सांगवीतील अतिक्रमणे हटविली
जुनी सांगवी, ता. २१ ः मुळा नदी किनाऱ्यावरील जुनी सांगवी परिसरातील जुन्या आणि रुंद सांडपाणी वाहिन्या बदलण्याच्या कामाला गती देण्यासाठी मुळा नगर पंपिंग स्टेशनजवळील अतिक्रमणांवर महापालिकेने कारवाई केली. झोपडपट्टी पत्राशेड तसेच अडथळे आणणारी इतर अतिक्रमणे हटविण्यात आली.
अंदाजे सहा हजार चौरस फूट जागेतील अनधिकृत पत्राशेडवर कारवाई करण्यात आली. या परिसरात सांडपाणी वाहिन्या वारंवार तुंबतात. त्यामुळे दुर्गंधी निर्माण होते, तसेच पावसाळ्यात पाणी साचते. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. यावर उपाय म्हणून मुख्य सांडपाणी वाहिनी बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. यातील अतिक्रमणांचा अडथळा दूर करण्यासाठी पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. त्याआधी संबंधितांना नोटिसा देण्यात आल्या होत्या, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सांगवीतील काही मुख्य वाहिन्या जुन्या झाल्याने क्षमता कमी पडत आहे. पावसाळ्यात त्या वारंवार तुंबतात. नवीन व जास्त क्षमतेच्या वाहिन्या टाकल्यानंतर परिसरातील सांडपाणी व्यवस्थापन सुकर होणार आहे. अतिक्रमण हटविल्यानंतर पुढील काम सुरू होईल. पंपिंग स्टेशन परिसरातील दुरुस्ती, दाब चाचण्या व मुख्य वाहिनीशी जोडणीची कामे टप्प्याटप्प्याने होणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी कामाच्या काळात सहकार्य करावे, असे आवाहनही
महापालिका प्रशासनाने केले.
‘ह’ क्षेत्रिय कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकारी तसेच सहाय्यक आयुक्त पूजा दूधनाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. अतिक्रमण निरीक्षक प्रकाश माने, कनिष्ठ अभियंता संदीप हजारे, बीट निरीक्षक रोहन कांबळे, शाबुद्दीन बागवान, शुभांगी चंदनकर, प्रफुल्ल भोकरे, सूरज माने आदी अधिकाऱ्यांनी नियोजन केले. या कारवाईसाठी महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या १८ जवानांनी बंदोबस्त ठेवला.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

