तळवडेमध्ये ‘पीएमपी’ने सख्ख्या बहिणींना चिरडले

तळवडेमध्ये ‘पीएमपी’ने सख्ख्या बहिणींना चिरडले

Published on

पिंपरी, ता. ९ : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएल) भरधाव बसने रस्ता ओलांडणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींना चिरडले. यात नऊ वर्षीय बहिणीचा मृत्यू झाला. तर, पोटात जुळी बाळे असलेली गर्भवती बहीण गंभीर जखमी झाली. मंगळवारी (ता. ९) दुपारी दीडच्या सुमारास तळवडे येथील ज्योतिबानगर परिसरातील म्हसोबा मंदिरासमोर येथे ही दुर्घटना घडली. त्यानंतर संतप्त नागरिकांनी बसवर दगडफेक करून काचा फोडल्या.
सुधा बिहारीलाल वर्मा (वय ९, रा. ज्योतिबानगर, तळवडे) असे मृताचे नाव आहे. राधा राम वर्मा (वय २५, रा. साई उद्यानाजवळ, तळवडे, दोघी मूळ - बलरामपूर, उत्तर प्रदेश) गंभीर जखमी झाली. देहूरोड पोलिसांनी बस चालक किरण भटू पाटील (वय ३५, रा. टॉवर लाईन, चिखली) याला अटक केली आहे.
बस तळवडे येथून निगडीच्या दिशेने जात होती. दुर्घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बस चालकाला ताब्यात घेतले. दरम्यान, राधावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
---
...तर सुधा वाचली असती
पीएमपी बसने धडक दिल्यानंतर दोघींना सुमारे वीस ते तीस मीटर अंतरापर्यंत फरफटत नेले. त्यानंतर बस चालकाने ब्रेक मारला तेव्हा दोघी बाजूला झाल्या. त्या सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच चालकाने बस पुन्हा मागे घेतली. त्यात बसचे चाक सुधाच्या डोक्यावरून गेले, असे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. चालकाने बस मागे घेताना तरी सावधगिरी बाळगली असती तर सुधा वाचली असती, अशी हळहळ अनेकांनी व्यक्त केली.
--------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com